सेनगाव तालुक्यातील माहेरखेडा येथील धक्कादायक प्रकार
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहेरखेडा येथे एका शेतात कांदा बियाणांच्या शेतात बेकायदेशीररीत्या शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार दि.१६ मार्च सोमवार रोजी सायंकाळी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.पोलीसांनी या धाडीत अंदाजे ८४ हजार ६५० रुपयांची ८० गांजाची झाडे जप्त केली असुन एका आरोपीला ताब्यात घेत गोरेगाव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
माहेरखेडा येथील कांदा बियाणांच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची गोपनीय माहिती गोरेगाव पोलीसांना मिळाली होती.त्यानंतर स.पोलीस निरीक्षक व्हि.एम.झळके,पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे,हे.काँ.अनिल भारती,राहुल मैंदकर,विठ्ठल नवले,होमगार्ड मधुकर बनसोड,गजानन बिडकर,प्रविण गिरे यांच्या पथकाने दि.१६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजताच्या सुमारास माहेरखेडा गावाबाहेरील गुगळपिंपरी जाणाऱ्या रोड लागत शेत गट क्र १ या शेतात धाड टाकली असता आरोपी विठ्ठल विश्रामजी ढोक वय ६५ वर्ष यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतातील कांदा बियाणांच्या पिकात गांजाची चोरट्या पध्दतीने लागवड केल्याचे दिसून आले.पोलीसांनी टाकलेल्या धाडीत ८ किलो ७४० ग्रँम वजनाची ८० गांजाची झाडे ज्याची अंदाजे किंमत ८४ हजार ६५० रुपये जप्त केली आहेत.या गांजाच्या झाडांना फुले,हिरवे पाने आणि बोंडे आलेली होती ज्याचा उग्रवास परीसरात येत होता.गोरेगाव पोलीसांनी फाँरेन्सिक टिमच्या मदतीने नमुने घेऊन सर्व झाडे मुळासकप उपटुन जप्त केली आहे.पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विठ्ठल विश्रामजी ढोक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुरनं ५४/२०२६ कलम ८(क),२० (बि)ii(ब) एन.डी.पि.एम.नुसार गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुढील तपास स.पोलीस निरीक्षक व्ही.एम.झळके हे करीत आहेत.














Add Comment