Editor Choice kolhapur Maharashtra

हिवरखेडा येथील जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करुन गावात पाणीपुरवठा चालु करा

ग्रामस्थांची जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

सेनगाव तालुक्यातील मौजे.हिवरखेडा येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम झाले आहे.विहीरीत भरपुर पाणी आहे,मात्र संबधीत ठेकेदाराने पाईपलाईनचे काम अंत्यत निकृष्ठ दर्जाचे केल्याने गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करुन गावात सुरळीत पाणीपुरवठा चालु करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थ व महिलांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दि.२ मार्च सोमवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई ५५ लिटर पाणी नियमितपणे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘हर घर जल’ जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरु केली आहे.दोन वर्षापुर्वी मौजे हिवरखेडा येथे पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली अन पाणीपुरवठा योजनेचे काम ही झाले.खोदलेल्या विहीरीला भरपुर पाणी आहे परंतु संबधीत ठेकेदाराने पाईपलाईनचे काम अंत्यत निकृष्ठ दर्जाचे केल्याने ती पाईपलाईन ठिक ठिकाणी फुटत असल्याने गावात पाणीपुरवठा होत नाही.तसेच गावातील अनेक ठिकाणचे नळ देखील मोडले आहेत.तसेच पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते परत दुरुस्ती करण्यासाठी संबधीत ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.प्रशासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करुन संबधीत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे.मात्र संबधीत ठेकेदाराने हे काम निकृष्ठ दर्जाचे केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रशासनाने तात्काळ हिवरखेडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची गंभीर दखल घेऊन संबधीत कामाची चौकशी करुन गावात पाणीपुरवठा सुरु करावा अन्यथा दि.१७ मार्च २०२६ रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थ व महिलांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.निवेदनावर गजानन रुस्तुमराव हराळ यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मौजे हिवरखेडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन संबधीत ठेकेदाराने निकृष्ठ‌ दर्जाची केली आहे.तसेच पाईपलाईन कामासाठी गावात नाल्या खोदल्या होत्या त्याची दुरुस्ती देखील संबंधित ठेकेदाराने केली नाही.खोदलेल्या विहीरीला भरपुर पाणी आहे मात्र हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे संबधीत कामाची चौकशी करुन गावात सुरळीत पाणीपुरवठा चालु करावा

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement