Hingoli dist Maharashtra Sports

अंध महिला टी-२० विश्वचषक विजेती गंगा कदमला शासनाकडून सन्मान द्यावा – आमदारांची मागणी

वसमत मतदारसंघाचे आमदार राजुभैया नवघरे आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी मा.उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
अंध महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत देशाचा गौरव वाढवला.या विजयात महाराष्ट्राची सुकन्या कु.गंगा संभाजी कदम हिने उपकर्णधार म्हणुन अत्यंत मोलाची भूमिका बजावत राज्याचा मान उंचावला.विशेष म्हणजे विजयी भारतीय संघात महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू म्हणून तिचा सहभाग असल्याने ही बाब विशेष अभिमानास्पद ठरली आहे.
कु.गंगा कदम हिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव व्हावा यासाठी शासन निर्णयानुसार तिला ₹ २ कोटी २५ लाखांचे पारितोषिक तसेच खेळाडू कोट्यातून शासकीय नोकरी देण्यात यावी,यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती दोन्ही आमदारांनी केली.
खेळाडूंना योग्य सन्मान आणि प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात अशा अनेक गंगा कदम घडतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Featured

Advertisement

Advertisement