स्विफ्ट डिझायर व मिनी बसचा झाला अपघात.
जिंतूर – जालना महामार्गावर गणेशपुर पाटीजवळील एका वळण रस्त्यावर रविवारी दुपारी दिडच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार व मिनीबसचा समोरासमोर भीषण अपघात झाला.या अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले.तर दोन्ही वाहनामधील एकूण आठजण जखमी झाले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सय्यद आबेदअली सय्यद महेबुबअली हे आपल्या कुटुंबियांसह ईदनिमित्त बहिणीला भेटण्यासाठी एमएच १२ जीएफ ६२५९ या कारमधून मंठा जि.जालना येथे जात होते.तर सतरा सीटर मिनीबसमधील मुस्लिम समाजातील नागरीक छत्रपती संभाजीनगर येथून जिंतुर तालुक्यातील बोरी येथे साखरपुड्यासाठी जात होते.गणेशपुर पाटीजवळील एका वळण रस्त्यावर दोन्ही वाहने एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला असून मिनिबसचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला आहे.या अपघातात मिनी बसचालक संतोष केशवराव शिंदे(वय ४९)रा.छत्रपती संभाजीनगर यांचा एक पाय निकामी झाला.त्यांच्यावर जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.तर स्विफ्ट कारमधील सय्यद आबेदअली सय्यद महेबुबअली(वय ३८) व त्यांची पत्नी सय्यद सुमैय्या सय्यद आबेदअली(वय ३२),भाऊ सय्यद इस्माईल सय्यद महेबुबअली (वय ३०),मोठी मुलगी (वय ०९) (नाव समजू शकले नाही) हे जागीच ठार झाले. तर उफत सय्यद आबेदअली (वय ०७),फरवा सय्यद आबेदअली(वय ०५) हे गंभीर जखमी झाले. मिनीबसमधील १३ प्रवाशांपैकी अशफाक कुरेशी(वय ६०),अक्रमखान(वय ६१),फैमुदा अक्रमखान (वय ५५),अबरार कुरेशी(वय ३५),मशीउल्लाबेग(वय ६०) आणी शाहेदा बेदम(वय ५५) सर्व रा.छत्रपती संभाजीनगर जखमी झाले.
भीषण अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी दळवे,पोलीस उपनिरीक्षक बी.व्ही.झिंजूर्डे,झोरे, कोकाटे,चव्हाण,हरी गायकवाड,ढाले व महामार्ग पोलीसांचे भगवान घोडके,महेश केदारी,बालासाहेब गिराम, सुर्यकांत हाके,मनोहर हाके आदी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कारमध्ये अडकलेले शव बाहेर काढण्यासाठी पिंपरी गीते येथील भगवान गिते यांच्यासह परिसरातील नागरीकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वसमत येथील चौघेजण चारठाणा जवळील अपघातात जागीच ठार













Add Comment