Articles Celebrities Editor Choice

श्रीक्षेत्र हट्टा ते श्रीक्षेत्र कारला पालखी सोहळ्याचे ७ फेब्रुवारी रोजी उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रस्थान.

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; shaking: 0.005116; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 0; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.0000,0.0000; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 30;

श्रीक्षेत्र हट्टा ते श्रीक्षेत्र कारला पालखी सोहळ्याचे ७ फेब्रुवारी रोजी उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रस्थान.

वसमत तालुक्यातील हट्टा येथील ग्रामदैवत श्री हट्केश्वर देवस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र कारला पालखी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पालखी सोहळ्याचे दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री हट्केश्वर देवस्थान, हट्टा येथून मोठ्या भक्तिभावात प्रस्थान झाले.

या पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन श्रीक्षेत्र हट्केश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आले होते.

या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम जवळाबाजार येथे असून रात्री मधुकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

दि. ८ फेब्रुवारी रोजी येळेगाव येथे मनीष आखरे यांच्या मळ्यात मुक्काम असून रात्री उमेश महाराज तपोणकर यांचे कीर्तन होईल.

दि. ९ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील खटकाळी हनुमान मंदिरात मुक्काम असून रात्री दत्ता महाराज कुरुंदकर यांचे कीर्तन होणार आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी कळमनुरी येथील महादेव मंदिरात मुक्काम असून रात्री शिवा महाराज शिवणीकर यांचे कीर्तन होईल.

दि. ११ फेब्रुवारी रोजी शेंबाळपिंपरी येथे रमेश भंडारी यांच्या मळ्यात मुक्काम असून आनंद महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

दि. १२ फेब्रुवारी रोजी सावरगाव बंगला येथे मुक्काम असून दुपारी ऋषिकेश महाराज तर रात्री कांता महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

दि. १३ फेब्रुवारी रोजी माणीकडोह येथे अशोक महाराज यांचे कीर्तन होईल.

यानंतर पुसद तालुक्यातील श्रीक्षेत्र कारला देवस्थान येथे पालखी दाखल होणार असून तेथे हनुमान महाराजांचे कीर्तन होणार आहे.

तसेच महाशिवरात्रीनिमित्त दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत अंबादास महाराज कुंभारीकर यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Featured

Advertisement

Advertisement