सामाजिक एैक्य आणि सदभावनेचं प्रतिक असणाऱ्या रमजान ईद निमित्त सेनगाव शहरातील इंदिरा नगरातील रहीवाशी मुस्लिम मावळा सय्यद अब्रार(हाबु)सय्यद जखिल व सय्यद मोसिन सय्यद जखिल बंधु यांच्याकडुन रमजान ईदचे औचित्य साधत दि.२१ मार्च शनिवार रोजी शिवस्मारक बांधकामासाठी ११ हजाराची देणगी देण्यात आली.सामाजिक बांधिलकी जपत ईद अशी ही साजरी केली जाते हे सय्यद बंधुनी आपल्या कृतीतुन दाखवुन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती,धर्माचे होते हा इतिहास आहे आणि आणि आज रमजान ईदच्या निमित्ताने शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यांचे प्रेम पुन्हा एकदा दिसुन आले.सेनगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११ इंदिरा नगरात राहाणारे सय्यद अब्रार (हाबु) सय्यद जखिल व सय्यद मोसिन सय्यद जखिल बंधुच्या कुटुंबियाकडुन त्यांच्या निवासस्थानी शिरकुम्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व धर्मिय बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमात ईद साजरी करत असतांना शिवराया प्रती प्रेम व्यक्त करीत सेनगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य शिवस्मारक उभारले जाणार आहे.त्या शिवस्मारक बांधकामासाठी सय्यद बंधु कडुन ११ हजाराची देणगी देण्यात आली.हि देणगी शिवस्मारक बांधकाम समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,नगराध्यक्ष वैभवराजे देशमुख,स्वप्निल देशमुख,बाजार समितीचे संचालक अंकुश तिडके,महादेव देशमुख,जगदीश गाढवे,गजानन उगिरे,योगेश महाजन,सय्यद अब्रार हाबु सय्यद जखिल,सय्यद मोसिन सय्यद जखिल,सय्यद शमीम,सय्यद लतीफ,फेरोज पठाण,सय्यद अरबाज सय्यद अब्रार,सय्यद फरहान सय्यद मोसिन आदीसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमजान ईद निमित्त सय्यद बंधु कडुन शिवस्मारक बांधकामासाठी ११ हजाराची देणगी













Add Comment