Celebrities Education Maharashtra

डॉ.मीरा नाकाडे यांची रासेयोच्या हिंगोली जिल्हा विभागीय समन्वयकपदी निवड

डॉ.मीरा नाकाडे यांची रासेयोच्या हिंगोली जिल्हा विभागीय समन्वयकपदी निवड
वसमत/ तालुका प्रतिनिधी
वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.मीरा नाकाडे यांची राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिंगोली जिल्हा विभागीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.मारोती गायकवाड यांच्या स्वाक्षरीचे या निवडीसंबंधीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
डॉ.मीरा नाकाडे या गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध विद्यार्थीविकासाचे आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविले आहेत.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागात वृक्षारोपण,ग्रामस्वच्छता,हिमोग्लोबिन तपासणी,आरोग्य शिबिर,पशुरोगनिदान शिबिर,रक्तदान शिबिर,एड्स जनजागृती,अवयव दान जनजागृती तसेच विविध ग्रामविकासाचे कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत.
या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा,डॉ.गोविंदराव इकलवार,श्री.राजेश दिगंबरराव मंचेवार,डॉ.गोकुळप्रसाद अग्रवाल,श्री.अशोकराव पडोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागनाथ पाटील तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement