वसमत येथे सनशाईन जी चॅम्प अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सविता नाकोड यांनी अबॅकसच्या विविध पातळीवरील स्पर्धापरीक्षांमध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर “बक्षीस वितरणाचा कार्यक्रम”आयोजित केला होता,जो नुकताच अतिउत्साही वातावरणात पार पडला. त्याचबरोबर ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त “सनशाईन होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा-मान सन्मानाचा” हा खेळ रंगला होता.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या वहिनीस मिळाली सुंदर पैठणी आणि उपविजेत्या वहिणीस सुंदर वन ग्रॅमचे मिनीगंठन मिळाले.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वसमत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती मॅडम,अध्यक्ष म्हणून हु.बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण शेळके सर,प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी मराठी मालिकेचे अभिनेते श्री.गजानन पाठक सर,(आरोग्य विभाग) तालुका सुपरवायझर सौ.नंदिनी चव्हाण (गरुड) मॅडम,वसमत पोलीस उपनिरीक्षक सौ.प्रणिता ढोरे मॅडम तसेच प्रमुख उपस्थिती मीराताई अनंतसा नाकोड हे कार्यक्रमास लाभले होते.
आलेल्या सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील आव्हानांसाठी मार्गदर्शन केले.तसेच जागतिक महिला दिनाची सुरुवात कधीपासून झाली व त्याचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या वहिनीस आकर्षक पैठणी व उपविजेत्यास उपहार वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले.
अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अबॅकसच्या लेव्हल वन,लेव्हल टू,स्टेट लेवल ऑनलाईन अबॅकस काॅम्पिटिशन,नॅशनल लेवल अबॅकस काॅम्पिटिशन (छ.संभाजीनगर)या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार,प्रथम पारितोषिक,द्वितीय पारितोषिक,तृतीय पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल्स,प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान केला.तसेच आकर्षक गिफ्ट्स सुद्धा देण्यात आले.बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रेरणादायी गाण्यांवर नृत्य करून सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले,ज्याला उपस्थितांनी त्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.संगीत खुर्ची,उखाणे,दोरीवरील उड्या अशा विविध खेळांतून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीच्या संचालिका सविता नाकोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर दिव्या स्वामी यांनी प्रभावीपणे पार पाडले.
जी चॅम्प अबॅकस अकॅडमी तर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.













Add Comment