Editor Choice Maharashtra Technology

लिट्ल किंग्स इंग्लिश स्कुल व मुक्ताई विद्यालय,संयुक्तरित्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

“विद्यार्थ्यांच्या चिकित्सक बुद्धीला व गुणवत्तेला वाव देण्यासाठी शालेय स्तरावर अशा विज्ञान प्रदर्शनांची नितांत गरज आहे,”
गटशिक्षणाधिकारी -सतीश काष्टे

दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कुल व मुक्ताई विद्यालय येथे संयुक्तरित्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनात शाळेतील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक व अभिनव प्रकल्प सादर केले.विद्यार्थ्यांच्या मॉडेल्स व प्रयोगांमधून त्यांची कल्पकता,संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वसमतचे गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे साहेब यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख साखरे सर, परीक्षक म्हणून केब्रिज महाविद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका पूजा बोरीवाले मॅडम,तसेच पालक प्रतिनिधी व शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष प्रा.विठ्ठल घिके सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काष्टे साहेब म्हणाले,“केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण न देता कृतीप्रधान व प्रयोगशील शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.अशा विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या चिकित्सक बुद्धीला चालना मिळते.भविष्यात हेच विद्यार्थी नवनवीन शोध लावून देशाचे नाव उज्ज्वल करतील.”त्यांच्या या मार्गदर्शनातून उद्याचे बालवैज्ञानिक घडवण्याचा संदेश देण्यात आला.
प्रदर्शनातील प्रत्येक प्रकल्पाचे परीक्षकांनी बारकाईने परीक्षण करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुचना व मार्गदर्शन केले.पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच विज्ञान विषयाचे मार्गदर्शक शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान विषयाचे शिक्षक श्याम सावंत सर,फारुखीसर,हेमा डांगे मॅडम,शीतल व्यवहारे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच,राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला नवे पंख मिळाले.

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement