पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या सुचनेवरून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही काळात झालेल्या चोरी,लूटमार,आदी घटनांची उकल करून आरोपींकडून जप्त केलेला चोरीचा माल मुळ मालकांना परत करण्यात येत आहे.
या मालिकेत अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून ५३ लाखांहून अधिक किमतीचा माल परत करण्यात आला
२८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात चोरीचा माल परत करण्याची मोहीम राबविण्यात आली.६ गुन्ह्यांमध्ये ३६ लाख,७६ हजार,७२० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, १ लाख, ८० हजार रुपये किमतीची ४ वाहने,१५ लाख,०५ हजार रुपये किमतीचे ७१ मोबाईल व इतर माल असा एकूण ५३लाख,६१ हजार,७२० रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला.पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी हिंगोली पोलीस दलाचे काम हाती घेतल्यापासून चोरीला गेलेला माल परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ६२ लाख,२७ हजार ३२० रुपयांचा माल तक्रारदारांना सन्मानाने परत करण्यात आला.वरील कारवाई पोलीस अधीक्षक निलाभ रोहन,अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीनाख,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,एलसीबीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले,पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रेमदास चव्हाण व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी केली.यापुढील काळातही चोरीचा माल मूळ तक्रारदारांना परत मिळावा यासाठी अशीच मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती एस.पी.निलाभ रोहन यांनी दिली आहे.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
वसमत जि.हिंगोली.














Add Comment