गोरेगाव येथील जल जीवन योजनेच्या कामात झालेल्या संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करा
शिंदे सेनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप अभियंत्याकडे निवेदनाव्दारे मागणी
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जल जिवन योजनेअंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजना कामात झालेला विलंब व संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करावी तसेच सदरील पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ चालु करावे अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल या संदर्भात शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने दि.२७ जानेवारी रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उप कार्यालय हिंगोलीचे उप अभियंता यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनाव्दारे नमुद करण्यात आले आहे की,गोरेगाव येथे जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मागील अनेक दिवसांपासुन चालु होते,परंतु हे काम एका वर्षापासुन बंद आहे.गोरेगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असुन पाण्याचा प्रश्न अंत्यत गंभीर आहे.सदरील कामाच्या अंदाजपत्रका बाबत,खर्चाबाबत तसेच प्रत्यक्ष केलेल्या कामाबाबत कोणतीही स्पष्ट माहीती ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही.त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.तरी दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यंत सदर जल जीवन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी समितीव्दारे सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी ठेकेदार,अभियंता,संबधीत अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच बंद असलेले काम त्वरीत पुर्ण करून गावातील नागरीकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळवुन द्यावा,अन्यथा दि.६ फेब्रुवारी २०२६ शुक्रवार रोजी गोरेगाव ते सेनगाव रोड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला असुन निवेदनावर शिंदे सेनेचे सेनगाव तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी व युवासेना तालुकाप्रमुख अशोक इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या गोरेगाव येथील जल जीवन योजनेच्या कामात झालेल्या संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करा
शिंदे सेनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप अभियंत्याकडे निवेदनाव्दारे मागणी
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जल जिवन योजनेअंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजना कामात झालेला विलंब व संभाव्य भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करावी तसेच सदरील पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ चालु करावे अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल या संदर्भात शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने दि.२७ जानेवारी रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उप कार्यालय हिंगोलीचे उप अभियंता यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनाव्दारे नमुद करण्यात आले आहे की,गोरेगाव येथे जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मागील अनेक दिवसांपासुन चालु होते,परंतु हे काम एका वर्षापासुन बंद आहे.गोरेगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असुन पाण्याचा प्रश्न अंत्यत गंभीर आहे.सदरील कामाच्या अंदाजपत्रका बाबत,खर्चाबाबत तसेच प्रत्यक्ष केलेल्या कामाबाबत कोणतीही स्पष्ट माहीती ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही.त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.तरी दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यंत सदर जल जीवन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी समितीव्दारे सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी ठेकेदार,अभियंता,संबधीत अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच बंद असलेले काम त्वरीत पुर्ण करून गावातील नागरीकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळवुन द्यावा,अन्यथा दि.६ फेब्रुवारी २०२६ शुक्रवार रोजी गोरेगाव ते सेनगाव रोड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला असुन निवेदनावर शिंदे सेनेचे सेनगाव तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी व युवासेना तालुकाप्रमुख अशोक इंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.आहेत.














Add Comment