Editor Choice Hingoli dist Maharashtra

विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी टायर जाळत कनेरगाव- जिंतूर रस्ता अडवला

हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले यानंतर राज्य सरकारने मोठ पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र राज्य सरकारने घोषित केलेला विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने दि.२४ मार्च मंगळवार रोजी सकाळी ११-३० वा.क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी रस्त्यावर उतरत टायर जाळत कनेरगाव-जिंतुर रस्ता अडवत सरकारचा निषेध करण्यात आला.
तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन झाल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी यांनी गौण खनिज नियमानुसार भरणा केल्या नसल्याचे तक्रार शेतकऱ्यांनी केली यामध्ये अनेक कंपन्यांनी जिल्ह्यामध्ये अवैध उत्खनन केले व या उत्खननाला जिल्हा गौणखनिज अधिकारी व उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.सेनगाव तालुक्यामध्ये आज जवळपास सहा महिन्यापासून कुठलाही रोजगार हमीचे कामे चालु नसल्याने शेतकरी यांनी विहीर गायगोठे व इतर रोजगार हमीची कामे कधी करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला केला.हिंगोली जिल्ह्यांमध्ये सत्तरच्या वर बोगस जैविक पेस्टिसाइड कंपन्या कार्यरत असुन यावर जिल्हा कृषी अधीक्षक चकार शब्दही बोलायला तयार नाहीत तसेच कारवाई करायला तयार नाहीत या अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा शेतकरी यांनी मंगळवार रोजी कनेरगाव-जिंतूर महामार्ग हाताळाफाटी या ठिकाणी अडवून टायर जाळले व जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,नामदेव पतंगे,सतीश इडोळे,प्रवीण मते,राहुल कावरखे,बबन कावरखे,अशोक कावरखे,दिपक सावके,शांतिराम सावके.यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Featured

Advertisement

Advertisement