Education Maharashtra Sports

हिंगोली पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी आ.संतोष बांगर यांचा माणुसकीचा हात.

हिंगोली पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी आ.संतोष बांगर यांचा माणुसकीचा हात.

 

  • मोफत निवास व भोजनाची चोख व्यवस्था.

 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.हिंगोली जिल्ह्यातही पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू असून,यासाठी राज्यभरातील हजारो तरुण आपलं नशीब आजमावण्यासाठी हिंगोलीत दाखल झाले आहेत. या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळात उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेत एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

राज्यातील युवकांसाठी मोफत सोय

भरतीसाठी आलेल्या युवकांना राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न भेडसावू नये,यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या वतीने हिंगोलीत मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लांबून आलेल्या मुलांच्या खिशाला फटका बसू नये आणि त्यांनी केवळ आपल्या मैदानी चाचणीवर लक्ष केंद्रित करावे,हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

उमेदवारांसोबत पंगतीत बसून घेतले भोजन

या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वतःआमदार संतोष बांगर यांनी या व्यवस्थेची पाहणी केली.केवळ पाहणीच केली नाही,तर त्यांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसोबत जमिनीवर पंगतीत बसून भोजनाचा आनंद घेतला.आमदारांच्या या साधेपणाने आणि आपुलकीने उपस्थित तरुण भारावून गेले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत आमदारांनी तरुणांचा उत्साह वाढवला आणि त्यांना भरतीसाठी शुभेच्छा दिल्या.

उमेदवारांनी व्यक्त केले आभार

आमदार बांगर यांनी केलेल्या या सुविधेमुळे उमेदवारांची मोठी सोय झाली आहे.अनेक उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यावर राहण्या-खाण्याचे खूप हाल होतात,पण आमदार साहेबांनी घरच्यासारखी सोय केल्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला आहे.”

 

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक: गिरीष देशमुख

वसमत जि.हिंगोली

मो.नं.9420529164

Featured

Advertisement

Advertisement