Editor Choice india Maharashtra

गिताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सल्लागारपदी बेंडकेसर व मिटकरसर यांची निवड.

गिताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सल्लागारपदी बेंडकेसर व मिटकरसर यांची निवड.

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख

वसमत शहरातील सहकार क्षेत्रात नव्याने स्थापन झालेल्या गिताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत उर्वरित तीन सल्लागार समिती सदस्यांना आज संस्थेच्या कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व आदर्श व्यक्तिमत्व श्री.व्ही.डी.बेंडके सर,श्री.वाय.टी.मिटकर सर तसेच श्री.जी.पी.महाराज यांचा समावेश आहे.
या नियुक्तीनंतर सल्लागार समिती सदस्यांची एकूण संख्या ११ झाली असुन वसमत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समितीत समावेश असल्याने संस्थेच्या प्रगतीसाठी निश्चितच मोलाचे मार्गदर्शन लाभेल,असा विश्वास संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मधुकररावजी पाष्टे यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे संचालक प्रतिनिधी श्री.सुधीरजी टुनकीकर,शाखाधिकारी शशी पांडे,खातेदार,कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
खो-खो या क्रीडा क्षेत्रात हु. बहिर्जी विद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजविणारे आदर्श क्रीडा शिक्षक म्हणुन ओळख असलेले श्री.वीरभद्र बेंडके सर यांची सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.यामध्ये माजी आमदार श्री. पंडितरावजी देशमुख सर, पार्डीकर सर,एन.एस.जाधव सर,महाजन सर,चिलवंत सर, लोमटे सर,अशोक भोसले सर, स्वामी सर,प्रा.इमडे सर,महादेव आप्पा बेले,रमेश आप्पा पत्रे,चंद्रकांत देवने,बाबुराव वाटुरे,पिंटू वायचळ सर,पाईकराव सर,दळवी सर,, ॲड.दीपक कटेकर,लायन्स क्लबचे अध्यक्ष.राजु सिद्दिकी, ॲड.अरुण आंबेकर,ॲड.प्रदीप देशमुख,जंगम समाजाचे अध्यक्ष अशोक स्वामी वाखारीकर,उपाध्यक्ष शिवा पत्रकार,माजी अध्यक्ष भारत स्वामी,आसेगावकर सर,संतोष स्वामी सोमठाणकर,शिवशंकर स्वामी बाळापुरकर,गुरुदास स्वामी,प्रभाकर स्वामी पोत्रेकर, महादेव स्वामी आसेगावकर, मल्लिकार्जुन स्वामी आसेगावकर,डॉक्टर संघर्ष बेंडके,सारंग बेंडके,विश्वनाथ बेंडके,डॉ.संदेश लोलगे,डॉ.वैभव पडोळे,गजानन कुरुंदकर,आदिनी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे संस्थेच्या कार्याला नवीन दिशा मिळून महिला सक्षमीकरण व सहकार क्षेत्रात संस्थेचे कार्य अधिक भक्कम होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement