Editor Choice Maharashtra Maharashtra crimes

सेनगाव पोलीस ठाण्यातुन पलायन केलेल्या आरोपीला अखेर ७ तासात ठोकल्या बेड्या

सेनगाव पोलीसांनी आरोपीला विदर्भातील रिठद येथुन घेतले ताब्यात,
सेनगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी

सेनगाव पोलीस ठाण्यातुन चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या एका आरोपीने पोलीसांची नजर चुकवुन पलायन केल्याची धक्कादायक घटना दि.२७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी पहाटे घडली.या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.मात्र सेनगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे पलायन केलेल्या आरोपीला अवघ्या सात तासात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिठद येथुन ताब्यात घेत बेड्या ठोकण्यात सेनगाव पोलीसांनां यश मिळाले आहे.

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील यात्रेत महिलांचे दागिने चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांच्या ताब्यात असलेला आरोपी अशोक धोंडुजी रोकडे याने शुक्रवार रोजी पहाटे पावने सहाच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जाण्याचे कारण सांगुन त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराची नजर चुकवली आणि संधीचा फायदा घेत पोलीस ठाण्याच्या परिसरातुन पलायन केले होते.ही बाब लक्षात येताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक डाँ.निलाभ रोहन,अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगावचे स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांनी चार पथके तयार करीत तपासाची चक्रे वेगाने फिरवली व ठिकठिकाणी आरोपीचा शोध घेणे चालु केले.हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील बुलढाणा,वाशिम जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने शोध मोहीम राबवली.अखेर ७ तासात तांत्रिक तपास आणि स्थानिक लोकांची मदत घेऊन आरोपी अशोक धोंडुजी रोकडे यास रिसोड-वाशिम रोडवर रिठद येथील साई रसवंती परीसरातुन ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.या पथकात स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के,पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे,हे.काँ.वंजारी,हेड काँ.जिवन मस्के,राठोड,राम मारकळ,चालक अंभोरे व क्षिरसागर यांचा समावेश होता.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement