Editor Choice Hingoli dist Politics

जवळा (बाजार )बाजार समितीवर विनोद अंभोरे सभापती,भगवानराव काचगुंडे उपसभापती

जवळा बाजार (ता.औंढा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवड प्रक्रियेकडे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.अखेर ही बहुचर्चित निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सभापतीपदी विनोद अंभोरे, तर उपसभापतीपदी भगवानराव काचगुंडे यांची निवड झाली.
सभापतीपदी निवड झालेले विनोद अंभोरे हे आमदार राजूभैय्या नवघरे यांचे सुरुवातीपासूनचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक मानले जातात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे.उपसभापतीपदी शिवसेनेचे भगवानराव काचगुंडे यांनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या निवडीनंतर जवळा बाजार परिसरात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि परस्परांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार राजूभैय्या नवघरे यांचे ही आभारही मानले.
जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडीला जिल्ह्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.निवड प्रक्रिया शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने परिसरात राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement