वसमत उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे डायलिसिस सेवेचा शुभारंभ
दि.१२ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित डायलेसिस सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी शहराच्या नगराध्यक्ष सौ सुनिता बाहेती,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य,शिवराज कदम श्री संकेत नामपल्ली,रविराज भाऊ डोळसे उपस्थित होते. नम्मुभैया,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपस्थित होते तसेच वसमत शहराचे सर्व नगरसेवक श्री सचिन दगडू ॲड दीपक कट्टेकर,राजू दादा एंगडे,हबीबभाई तांबट,हरून भाई मुजिब पठान,मनोज चव्हाण,बालाजी जाधव,मुबीनदा,वाहुळे,अब्दुल सत्तार,उपस्थित होते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सचिनजी भोसले खरेदी-विक्री संघाचे माननीय श्री बोखारे साहेब उपस्थित होते.कंपनीच्या वतीने श्री विकास कदम साहेब क्लस्टर हेड उपस्थित होते.यावेळी बोलताना माननीय आमदार नवघरे साहेब यांनी सर्व गरजू रुग्णांनी या मोफत डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.सदरील सेंटर सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय वसमत डॉ.गंगाधर काळे,यांनी सतत पाठपुरवठा केला व सेंटर साठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.माननीय आमदार राजू भैया नवघरे साहेब यांच्या प्रयत्नामुळे सेंटरचे मान्यता मिळाली.सदरील डायलिसिस सुरु करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी,हिंगोली राहुल गुप्ता सर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी पी जोगदंड सर यांनी केले.तर या उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन डॉक्टर सौरभ मसारे यांनी केले.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
9420529164














Add Comment