Editor Choice Education Maharashtra

लिट्ल किंग्जच्या शिवपालखीने वसमत शहर भगवे मय.

लिट्ल किंग्जच्या शिवपालखीने वसमत शहर भगवे मय

ढोल-ताशांच्या गजरात दणाणला शिवजन्मोत्सव

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख

लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित भव्य शिवपालखी सोहळ्याने वसमत शहर अक्षरशः भगवे मय झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या दिमाखदार मिरवणुकीत शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवभक्तीचा जल्लोष अनुभवला.
सोहळ्यात विद्यार्थ्यांनी साकारलेले संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ आणि वासुदेव यांचे जिवंत ऐतिहासिक देखावे पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले.पारंपरिक वेशभूषा,नेटक्या साजशृंगारासह बालचिमुकल्यांनी उभा केलेला शिवकाल जणू प्रत्यक्ष अनुभवत असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली.
सुमारे १२० मुला-मुलींनी साकारलेल्या ढोल-ताशा व झांज पथकाच्या निनादाने वातावरण दणाणून गेले.“जय भवानी,जय शिवाजी”, “जय जिजाऊ,जय शिवराय”या घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाची लाट उसळली.मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शिवरायांना अभिवादन केले.
शिवपालखी शिवतीर्थावर पोहोचताच तालुक्याचे आमदार राजू भैया नवघरे यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.यावेळी वसमत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुनीताताई बाहेती माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार,सुनील काळे,शिवाजी अडलिंगे,तसेच शहरातील माजी व आजी नगरसेवक आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल ही संस्था बालवयापासून विद्यार्थ्यांच्या मनात शिवचरित्र, शिवसंस्कार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रोवण्यासाठी कटिबद्ध आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मूल्याधिष्ठित संस्कार आणि शिक्षण देण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न या शिवजन्मोत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
शाळेतील सर्व शिक्षकांनी मागील आठ दिवसातच या सोहळ्याची नेटकी तयारी केली होती.
सुरुवातीलाच सकाळी नऊ वाजता शाळेतील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शिवपालखी शिवतीर्थाकडे रवाना करण्यात आली.
या भव्य आणि प्रेरणादायी शिवपालखी सोहळ्यामुळे वसमत शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी शाळेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी शहरातील हजारो शिवप्रेमी बांधवांनी या नयना सोहळ्याचा याच देही याच डोळा आनंद घेतला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement