Editor Choice • Education • Hingoli dist

लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कुलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’अंतर्गत बालसुरक्षा कार्यशाळा संपन्न.

लिटल किंग्ज इंग्लिश स्कुलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’अंतर्गत बालसुरक्षा कार्यशाळा संपन्न

पॉक्सो कायदा,गुड टच-बॅड टच आणि बालकांच्या हक्कांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत

वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पॉक्सो कायदा आणि बालसंरक्षण या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.तालुका विधी सेवा समिती,वसमत यांच्या वतीने ‘सुरक्षित बचपन अभियान’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पॉक्सो (POCSO) कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली.बालकांवरील अत्याचार,छळ आणि लैंगिक छळ ओळखण्याची पद्धत,गुड टच आणि बॅड टच यातील फरक तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जिल्हा न्यायालय, वसमत येथील ॲड.सुरेंद्र कुमार वरवंटे आणि तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक संतोष निंबरे पाटील यांनी मार्गदर्शक म्हणुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनुचित प्रसंग उद्भवल्यास घाबरून न जाता विश्वासु व्यक्तीची मदत कशी घ्यावी, आपल्या सुरक्षिततेसाठी आवाज कसा उठवावा आणि बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींचा उपयोग कसा करावा,याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बालकांचे हक्क,संरक्षणासाठी असलेले कायदे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.सुरक्षित बालपण,जागरूक विद्यार्थी आणि बालसंरक्षणाची जबाबदारी यांचा संदेश देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरली.

या कार्यशाळेला शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement