Accident • Editor Choice • Hingoli dist

हट्टा येथे भीषण अपघात,एकाचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी

हट्टा येथे भीषण अपघात,एकाचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी

इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि पिकअपची धडक,अपघातानंतर पिकअप चालक पसार

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख, वसमत

हट्टा ते झिरो फाटा मार्गावरील सुपर हॉटेलसमोर २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला.या अपघातात मोटारसायकलवरील तिघे जण गंभीर जखमी झाले होते.त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले.दरम्यान,या तिघांपैकी त्र्यंबक सातपुते यांचा मृत्यू झाला असुन,अन्य दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.तिघेही एरंडेश्वर ता.पुर्णा जि. परभणी रहिवासी असल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,हट्टा ते झिरो फाटा मार्गावरील सुपर हॉटेलसमोर इलेक्ट्रिक मोटारसायकलला एमएच २२-२२५० क्रमांकाच्या पिकअपने जोरदार धडक दिली.या धडकेत मोटारसायकलवरील तिघेही गंभीर जखमी झाले.अपघातानंतर संबंधित पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी किरण धोत्रे आणि होमगार्ड शेख अन्वर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. अपघातामुळे घटनास्थळी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार बसवंते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतुक व्यवस्था सुरळीत केली.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून निघुन गेल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.अपघाताची नेमकी कारणे,चालकाची ओळख आणि पुढील कायदेशीर कारवाई याबाबतचा तपास पोलिसांकडुन सुरू आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement