वसमत येथे २० आक्टोंबर रोजी रात्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने भव्य अतिशबाजी व रावण दहन.
विवीध पक्षांचे पदाधिकारी,व्यापारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे दसरा समितीचे आवाहन.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री सार्वजनिक नवरात्र (दसरा) महोत्सव २०२६ अंतर्गत मंगळवार,दि. २० ऑक्टोबर रोजी जि.प.प्रशालेच्या मैदानावर सायंकाळपासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला रावण दहनाचा कार्यक्रम रात्री ११ वा होणार असुन,या कार्यक्रमाला वसमत शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संत नामदेव सेवाभावी संस्था,वसमत संचलित सार्वजनिक नवरात्र (दसरा) महोत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.दसरा महोत्सवाच्या माध्यमातुन धार्मिक परंपरा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.रावण दहन हा या महोत्सवातील महत्त्वाचा कार्यक्रम असुन,दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
मंगळवार,दि.२० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा.विजेत्या स्पर्धकांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.त्यानंतर रात्री १० वा.आतिषबाजी,बक्षीस वितरण आणि विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमांनंतर रात्री ११ वा.रावण दहन करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास वसमत शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.दसरा महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक परंपरेचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा तथा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ.सुनीता मनमोहन बाहेती आणि शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे चेअरमन तथा समितीचे कार्याध्यक्ष श्री.शिवदास बोड्डेवार यांनी वसमत शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.














Add Comment