दि.२७ फेब्रुवारी रोजी वसमत येथील नामांकित असलेल्या हु.बहिर्जी स्मारक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन विविध शालेय उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन दि.२७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.हा दिवस मराठी भाषेचे जतन,संवर्धन आणि गौरव करण्यासाठी साजरा करण्यात येतो.साहित्यातील महान कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन आहे.मराठी साहित्यातील त्यांच्या मोठ्या योगदानामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दि.२६ फेब्रुवारी रोजी हु.बहिर्जी स्मारक विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तपासणी पथक आले होते त्यामध्ये सन्माननीय शरद गोसावी साहेब शिक्षण संचालक प्राथमिक.पुणे,तसेच सन्माननीय गणपतराव मोरे साहेब,शिक्षण उपसंचालक पुणे,सन्माननीय अंकुश ससाने साहेब,वरिष्ठ अधिव्याख्याता अकोला,श्री पवार साहेब,शिक्षणाधिकारी अकोला, श्री भागवत साहेब शिक्षण अधिकारी,हिंगोली,श्रीमती काळे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक हिंगोली,श्री सोनटक्के साहेब शिक्षणाधिकारी,हिंगोली तसेच वसमत चे गटशिक्षणाधिकारी श्री काष्टे साहेब व हु.बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव श्री पंडितराव देशमुख सर,बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.जी.शेळके सर,माजी मुख्याध्यापक श्री बी.एस.खिल्लारे सर,उप मुख्याध्यापक जी.आर.आरकिलवाड सर,पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही.जाधव मॅडम,पर्यवेक्षक श्री डी.आर.बागल सर,पर्यवेक्षक श्री के.बी.वायचाळ सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनाच्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हु.बहिर्जी विद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये मराठी विभागाचे श्री.सुदाम गडगिळे सर,श्री गजानन नवघरे सर,श्रीमती कविता हंबर्डे मॅडम, श्रीमती आशा संगेवार मॅडम,श्री संदीप कदम सर,श्री साईनाथ काकडे सर,दुपार सत्रातील श्री भास्कर लोंढे सर,श्रीमती मनी मॅडम,श्रीमती कल्याणकर मॅडम,श्रीमती बोखारे मॅडम या सर्व मराठी विभागातील शिक्षकांनी अतिशय सुंदर नियोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भित्तिपत्रक तयार करून घेतले.त्यासाठी कला शिक्षक वसंत गाडेकर सर आणि अमोल सालमोठे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या कविता,विद्यार्थ्यांनी तयार केलेले पुस्तके,कुसुमाग्रजांचा जीवन परिचय पत्रक,विविध मराठी लेखकांच्या कादंबऱ्या, कविता,ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यिकांची चरित्रे असे सुंदर असे भित्तिपत्रक मराठी विभागातील सर्व सन्माननीय शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तयार करून मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात आनंदात साजरा करून सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या मराठी भाषा गौरव दिनाच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून आपली मराठी भाषा जपली पाहिजे तिचे संवर्धन केले पाहिजे आणि जास्तीत जास्त ग्रंथ आपण मराठीत लिहिले पाहिजे आणि वाचले पाहिजे असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे छायांकन साई म्यानेवार यांनी केले.या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग,शालेय क्रीडा विभाग,शालेय शिस्त विभागाने मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख














Add Comment