Editor Choice Hingoli dist Maharashtra

हट्टा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य जळून खाक.

हट्टा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य जळून खाक.

हट्टा येथील रहिवाशी फरीदा फरोज खां पठाण यांच्या घराला दि.५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य जळून खाक झाले.ही घटना अचानक घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्राप्त माहितीनुसार,घरातील विजेच्या शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असुन आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील कपडे, भांडी,फर्निचर तसेच इतर संसार उपयोगी वस्तु,अन्नधान्य आदी साहित्य पूर्णपणे जळून राख झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला,नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसुन,मात्र प्राप्त माहितीनुसार कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यामध्ये एकूण दोन लाख २३ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी निर्मले साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व प्रशासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement