Editor Choice Education Maharashtra

आराध्या बाहेकर ची व्हॉइस आर्टिस्टच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर मिळवले यश

आजचे युग हे तंत्रज्ञान व डिजिटलचे आहे.आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये
ओटीटी,प्लॅटफॉर्म्स,यूट्यूब व्हिडिओज,पॉडकास्ट,ई लर्निंग कोर्सेस ब्रँड जाहिरातीमुळे व्हॉईस आर्टिस्ट ची मागणी वाढत असून या क्षेत्रात देखील करिअरच्या दृष्टीने पाहिले जात आहेत.अशीच एक परभणी येथील बाल व्हॉईस आर्टिस्ट कु.आराध्या प्रशांत बाहेकर हीने या क्षेत्रात चाईल्ड व्हॉइस आर्टिस्ट म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे.तिने इंडिया व्हॉईस फेस्ट अवॉर्ड सह अन्य मानाचे पुरस्कार देखील प्राप्त केले.
आवाजाच्या दुनियेत कौशल्याच्या बळावर सुध्दा नावारूपाला येता येते हे परभणी येथील कु.आराध्या प्रशांत बाहेकर हिने सिद्ध केले.तिने व्हॉईस आर्टिस्ट कलागुणाच्या जोरावर राज्य स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उल्लेखनीय यश संपादन केले.
अवघ्या सहा वर्षाच्या वयापासून अभिनय,नृत्य,विशेषता इंग्रजी भाषेतील व्हाईस ओव्हर क्षेत्रात ती सातत्याने कार्यरत आहे.आज ती एक यशस्वी चाइल्ड व्हॉईस आर्टिस्ट व चाईल्ड ॲक्टर म्हणून ओळखली जाते.आराध्याने
बंगळूर येथील प्रसिद्ध नारायण हेल्थ हॉस्पिटलच्या जाहिरातीसाठी केलेल्या प्रभावी कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली.या उल्लेखनीय कामासाठी डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे तिला इंडिया व्हॉईस फेस्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला.२०२५ मध्ये क्लाऊडलाईन हॉस्पिटलच्या जाहिरातीसाठी केलेल्या इंग्रजी डबिंगसाठी ही तिला मानाचा पुरस्कार मिळाला आहे.आराध्याची मोठी बहीण वैभवी ही देखील एक प्रभावी व्हॉईस आर्टिस्ट आहे.तिने नेटफिक्सच्या एका जपानी चित्रपटासाठी डबिंग केले आहे तर आराध्यने बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून लहान वयापासूनच सातत्याने मेहनत घेऊन परभणी सारख्या छोट्या शहरात राहून मुंबईसारख्या मोठ्या आणि स्पर्धात्मक क्षेत्रात व युगात आराध्याने स्वतःची स्वतंत्र अशी स्वतःची ओळख निर्माण केली.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement