Editor Choice Health & Fitness Hingoli dist

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाभुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न उपस्थित

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी बाभुळगाव ता.वसमत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न विधानभवनात ठामपणे मांडला.
बाभुळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजुर होऊन पूर्णत्वास आली असली तरी आवश्यक पदभरती न झाल्यामुळे हे आरोग्य केंद्र अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.त्यामुळे बाभुळगाव व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राजुभैय्या नवघरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.यावर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक पदभरती शासनामार्फत लवकरात लवकर करण्यात येईल,असे सांगितले.तसेच बाभुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.
हे आरोग्य केंद्र सुरू झाल्यास बाभुळगाव व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेचा मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आमदार राजु भैय्या नवघरे विधानभवनात सातत्याने आवाज उठवत आहेत.

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement