Agriculture News Editor Choice Hingoli dist

परराज्यातील हार्वेस्टर यंत्र चालकांच्या माध्यमातुन दलालाकडुन शेतकऱ्यांची लुट

परराज्यातील हार्वेस्टर यंत्र चालकांच्या माध्यमातुन दलालांकडुन शेतकऱ्यांची लुट असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधे होत आहे.
पोलीस प्रशासन व महसुल विभागाने लक्ष घालण्याची मागणी
सेनगाव तालुक्यात गहु काढणीचा हंगाम सुरु झाला असुन बहुतेक शेतकरी हार्वेस्टर मशिनने गहु काढणे पसंद करतात.यामुळे कमी वेळेत चांगला,स्वच्छ प्रकारचा गहु यातुन निघतो.मात्र पंजाब,हरीयाणा राज्यातुन आलेल्या हार्वेस्टर चालक व स्थानिक दलाल शेतकऱ्यांकडुन एकरी खर्च दुपटीने वसुल करीत असल्याने सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लुट करीत आहेत यात मात्र दलालांचा गोरख धंदा जोमात सुरु असल्याचे दिसुन येत आहे.
हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यात गहु काढण्यासाठी पंजाब,हरीयाणा राज्यातील हार्वेस्टर दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या महिन्यात दाखल होतात गहु हंगाम हा जवळपास मार्च महिना अखेर पर्यंत चालत राहातो.यावर्षी सेनगाव तालुक्यात १२ ते १५ हार्वेस्टर मशिन दाखल झाल्याने गहु काढण्यासाठी शेतकरी एकच गर्दी करीत आहे.यावर्षी गव्हा बरोबर हरभरा व चिया पिकाची पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल घरी आणण्यासाठी घाई झाली आहे.नेमकी हिच संधी साधुन हार्वेस्टर मशिन चालक व शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधा पर्यंत रस्ता दाखविणारे मध्यस्थी करणारे दलाल शेतकऱ्यांची लुट करण्याचा काळाबाजार जोमात सुरु आहे.या गंभीर प्रकाराकडे स्थानिक पोलीस व महसुल विभागाने लक्ष घालुन शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement