Editor Choice Hingoli dist Maharashtra

“गण गण गणात बोते”च्या गजराने मराठवाडा दुमदुमणार,१ जुलैला श्री संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल


“गण गण गणात बोते”च्या गजराने मराठवाडा दुमदुमणार १ जुलैला श्री संत गजानन महाराजांची पालखी पानकनेरगांव येथे विसावा घेऊन सेनगाव कडे प्रस्थान.

 

दिशा न्युज मराठी २४×७.

मुख्य संपादक : गिरीष देशमुख 

सेनगाव प्रतिनिधी/विश्वनाथ देशमुख

” गण गण गणात बोते” च्या गगनभेदी जयघोष,टाळ-मृदंगाचा मंत्रमुग्ध करणारा गजर आणि विठुरायांच्या ओढीने पाऊली खेळणारे सुमारे ७०० वारकरी अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पायदळ पालखी दिंडीचे बुधवार,दि.१ जुलै बुधवार रोजी विदर्भातुन मराठवाड्यात आगमन होणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपुर्ण सेनगाव नगरी सज्ज झाली असुन,प्रशासनाने ही तयारी पुर्ण केली आहे.

श्रींच्या पायदळ पालखीचे दि.१ जुलै बुधवार रोजी सकाळी ६ वाजता मराठवाड्याच्या सिमेवर आगमन होईल.त्यानंतर दुपारी पानकनेरगाव येथुन मार्गक्रम करत सायंकाळी ५ वाजता पालखीचे सेनगाव शहरात भव्य स्वागत होणार आहे.या सोहळ्यानिमित्त सेनगावात अभुतपूर्व उत्साहाचे वातावरण असुन,शहरात ठिक ठिकाणी स्वागताचे बॅनर,आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घालुन माऊलींचे स्वागत केले जाणार आहे.नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ही पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.

जिल्हा परीषद शाळेत दर्शनासाठी सोय,कृषी उत्पन्न बाजार समितीत महाप्रसादाचे नियोजन

सेनगाव शहरासह परीसरातील सुमारे १६ गावांमधुन हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येणार आहेत.भाविकांना सुलभ आणि सुरक्षितपणे दर्शन घेता यावे,यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या भव्य प्रागंणात पालखी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.तसेच,सेनगाव नगरवासियांकडुन वारीतील सर्व वारकरी बांधवासाठी जेवणाची व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.तर भाविकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रागंणात महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.

दि.२ जुलैला पहाटे श्रींची महाआरती आणि श्री क्षेत्र नर्सी नामदेव कडे प्रस्थान

सेनगाव शहरातील मुक्कामानंतर,गुरुवार दि.२ जुलै रोजी पहाटे ४ वाजता श्रींची महाआरती संपन्न होईल.महाआरती आटोपल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी म्हणजेच ‘श्री क्षेत्र नर्सी नामदेवकडे प्रस्थान करेल.तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवाधारी संयोजन समिती व प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

“श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सेनगाव शहरात भाविकांची गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भाविकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असुन,दर्शन रांगेत भाविकांनी शिस्त पाळावी,कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवु नये.तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे सर्कीय होण्याची शक्यता असल्याने आपले मोबाईल,पाकीट व महिलांनी दागिन्यांची स्वतः काळजी घ्यावी.काहीही संशयास्पद आढळल्यास त्वरीत तैनात पोलीसांशी संपर्क साधावा”

सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव,पोलीस स्टेशन सेनगाव

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement