वसमतच्या सार्वजनिक दसरा महोत्सवात कुस्ती,सांस्कृतिक आणि वक्तृत्व स्पर्धांची भव्य मेजवानी!
जगाचा पोशिंदा शेतकरी राज्याच्या मनोरंजनासाठी भव्य शंकरपटाचे आयोजन,कुस्तीच्या आखाड्यात मल्लांचा थरार,लोकनृत्य व समुहगायनातुन विद्यार्थ्यांचा कलाविष्कार,आज १८ ऑक्टोबर रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धा.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत,
वसमत येथील संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित श्री सार्वजनिक नवरात्र (दसरा) महोत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा, जिल्हास्तरीय शालेय लोकनृत्य आणि लोकगीत समूहगायन स्पर्धा उत्साहपुर्ण वातावरणात पार पडल्या.कुस्तीच्या आखाड्यात मल्लांच्या चुरशीच्या लढतींनी कुस्तीप्रेमींना रोमांचित केले,तर सांस्कृतिक सभागृहात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्य आणि लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली.क्रीडा,लोककला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांना नागरिक,विद्यार्थी,शिक्षक आणि कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान,रविवार, दि.१८ ऑक्टोबर रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन.
वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवदासजी बोड्डेवार,सुनीलभाऊ काळे,सीताराम म्यानेवार,भोपाळे मामा,रवि बडवणे,श्रीनिवास पोराजवार,तानाजी कदम,नगरसेवक मयुर नावंदर,राजु भोसले,नगरसेवक प्रभाकर क्षिरसागर रसागर,प्रकाश शहाणे,विनोद नामपल्ली,साई पतंगे,रियाज कुरेशी,नगरसेवक राजु पवार,राम साबणे पाटील,गणेश भालेराव यांच्यासह दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्हाभरातील कुस्तीपटुंनी सहभाग नोंदविला.पारंपरिक कुस्तीला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित मल्लांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.आखाड्यात रंगलेल्या चुरशीच्या लढतींमुळे उपस्थित कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
लोकनृत्य आणि समुहगायनातुन विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
दसरा महोत्सव समितीच्या वतीने सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय शालेय लोकनृत्य आणि लोकगीत समुहगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन योगानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागनाथ पाटील यांच्या हस्ते झाले,तर अध्यक्षस्थानी प्रा.डी.कदम सर होते.
लोकगीत समुहगायन स्पर्धेत लिटल इंग्लिश स्कुल आणि लालबहादुर शास्त्री महाविद्यालय यांनी क्रमांक पटकावले.सामुहिक लोकनृत्य स्पर्धेत अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.कुरुंदा,कौठा यांसह विविध गावांतील शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लोकगीतांनी आणि आकर्षक लोकनृत्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातुन त्यांच्यातील कलागुण,सांघिक भावना आणि सांस्कृतिक परंपरेविषयीची जाणीव दिसून आली.
या कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषद प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे,प्रा.डॉ.संदिप गोरे,माजी नगराध्यक्ष तथा शिवेश्वर बँकेचे चेअरमन शिवदासजी बोड्डेवार,माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे,रवि बनवणे,भोपाळे मामा,प्रा.अंभोरे सर,माजी प्राचार्य मुगुटकर सर,सचिन दगडु,गजानन पाठक,राठोड मॅडम (अभ्यंकर ),अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सरिता ताई,शिवाजीराव पतंगे मॅडम,मुख्याध्यापक श्याम मग्गीरवार सर,नगरसेवक धनंजय गोरे,माजी नगरसेवक अजगर पटेल,शिवाजी आडलिंगे,गणेश काळे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमाकांत पुणे,पत्रकार चंद्रकांत देवणे,गिरीश देशमुख,बालाजी अडकिने,प्रशांत लोखंडे,संजय बर्दापुरे,येलप्पा मिटकर सर,बालाजी अडकिने,ठोके सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश इंगळे सर यांनी केले,तर आभार प्रा.सचिन कोल्हे सर यांनी मानले.
आज भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमांची मालिका पुढे सुरू ठेवत रविवार,दि.१८ ऑक्टोबर रोजी सूरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ११ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असुन देवगिरी प्रांत बजरंग दलाचे पालक कृष्णाजी देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची, वक्तृत्वकौशल्य विकसित करण्याची आणि वैचारिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
क्रीडा,संस्कृती आणि शैक्षणिक उपक्रमांचा संगम
वसमतच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या माध्यमातुन कुस्ती स्पर्धा,लोकनृत्य,समुहगायन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे पारंपरिक क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे.महोत्सव समितीच्या नियोजनातुन धार्मिक उत्सवाला क्रीडा,सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची जोड मिळत असुन नागरिकांमध्येही या कार्यक्रमांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.














Add Comment