Celebrities Editor Choice Health & Fitness

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हट्टा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हट्टा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

४५ रक्तदात्यांचा सहभाग

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हट्टा ता.वसमत येथील आनंद बुद्ध विहार येथे पंचशील मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.समाजहिताचा विचार करून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवून रक्तदान केले.रक्तदान हे जीवनदान मानले जाते आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याने उपस्थितांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. शिबिरादरम्यान आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद कापुरे,उपाध्यक्ष हर्षदीप खाडे,कोषाध्यक्ष करण खाडे जगदीश खाडे तसेच माणिक खाडे,सुनील खाडे,नरेंद्र खाडे, राजरत्न खाडे,मुकेश खाडे, राहुल खाडे,स्वप्निल खाडे, पांडुरंग खाडे,नितीन खाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement