Editor Choice Health & Fitness Maharashtra

नशामुक्त भारत अभियानाचा उपक्रम संपन्न

 

नशामुक्त भारत अभियानाचा उपक्रम संपन्न

 

प्रेमी युगलातील जोडीदार व्यसनीं असल्यास जगात येणाऱ्या भावी अपत्यामध्ये ४०% तर,युगल नशेबाज असलेल्या परिस्थितीत येणारे मूल ४००% व्यसनी होण्याची शक्यता” व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यने दि.१४ शनिवारी व्हॅलेंटाईन दिनी व्यक्त केली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत, राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अधिनस्त राज्यात १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान नशामुक्त भारत अभियान अंतर्गत वसमत शहरात नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच च्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती राबविण्यात आली.नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल म्हणाले,व्यसनांची नशा ही घातक आहे.प्रेमाची नशा साथ देणारी आहे.त्याकरिता प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी निर्व्यसनी जोडीदाराची निवड करणे ही काळाची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात आवाहने पेलतांना दिवसेंदिवस व्यसनांमध्ये गुरफटण्याच्या प्रमाणात वाढ होतांना निदर्शनास येत असल्याची खंत देखील जनजागृती दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. व्यसनांपासून लांब असलेल्या जोडीदाराला प्राधान्य क्रम देऊन सुंदर आयुष्य जगण्याची प्रेरणा प्रेमी युगुलांनी घ्यावी अशा अपेक्षा नशाबंदी मंडळाच्या जिल्हा अध्यक्षा शुभदा सरोदे यांनी व्हॅलेंटाइन दिनानिमित्त व्यक्त केल्या आहेत.

दिशा न्युज मराठी २४×७ मुख्य संपादक: गिरीष देशमुख

 

 

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement