वसमत शहराच्या सुशोभीकरणात भर
मोठ्या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असुन
शहरातील मोठ्या तलावाच्या दुरूस्ती व सुशोभीकरणाच्या कामाची आमदार राजुभैया नवघरे यांनी पाहणी केली व तलावाच्या
पुढील सुशोभीकरण व दुरुस्तीच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या.
आमदार राजु भैया नवघरे यांच्या प्रयत्नांतुन वसमत तालुक्यासह शहरात विकास कामांची गंगा वाहत असुन.
याच विकासकामांच्या माध्यमातुन वसमतचे आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नातुन वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात,गुरुद्वारा दम दमा साहेब यांच्या बाजुस मोठा तलाव असुन.
मागील दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने क्षमतेपेक्षा जास्त पाणी तळ्यात आल्याने तलाव फुटून तलावातील पाणी जुन्या वसमत शहरात नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन संसार उपयोगी साहित्याचे व घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.
सदरील तलावाच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी वसमतचे आमदार राजुभैया नवघरे यांनी निधीसाठी पाठपुरावा करून शासनातर्फे ०२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
सदरील मोठे तलावाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी दि.२१ फेब्रुवारी रोजी आमदार राजु भैया नवघरे यांनी केली व तलावाच्या पुढील कामासाठी अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या
या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन दगडु,नगरसेविका रेणुकाताई पतंगे,शिवसेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले,भीमराव भोसले यांच्यासह वसमत शहरातील नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.














Add Comment