Editor Choice Maharashtra Maharashtra crimes

पोलीस स्टेशन हट्टा च्या ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर आमदार राजुभैया नवघरे यांनी केली नाराजी व्यक्त.

पोलीस स्टेशन हट्टा च्या ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर आमदार राजूभैया नवघरे यांनी केली नाराजी व्यक्त

हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना आमदार राजुभैया नवघरे यांनी सुनावले खडे बोल.

हट्टा ता.वसमत येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी विनापरवाना शिवस्मारकाची स्थापना करण्याच्या कारणातुन हट्टा पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये ज्यांचा काहीही संबंध नव्हता अशा युवकांची नावे टाकण्यात आली आहेत असे हट्टा ग्रामंस्थानचे म्हणणे आहे.
दि.२२ फेब्रुवारी रोजी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैया नवघरे यांनी हट्टा येथे जाऊन गावकऱ्यांची व शिवभक्तांची भेट घेतली,त्यांच्या व्यथा ऐकुन घेतल्या
व पोलीस स्टेशन हट्टा येथे जाऊन घटनेची विस्तृत माहिती घेऊन या प्रकरणात ज्यांचा काही सहभाग नाही अशांची नावे वगळण्यात यावी,ज्यामध्ये काही शिवभक्त हे शैक्षणिक जीवनातून वावरत असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होऊ शकते त्यामुळे ज्या युवकांचा काही संबंध नाही त्यांची नावे तात्काळ वगळुण टाकावी अशी विनंती आमदार राजुभैया नवघरे यांनी हट्टा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री संग्राम जाधव यांना केली.
या प्रकरणात पोलीस प्रशासनास गावकरी व शिवप्रेमी निश्चित सहकार्य करतील अशी ग्वाही देखील आमदार राजुभैया नवघरे यांनी पोलीस प्रशासनाला बोलताना दिली.
यावेळी आमदार राजुभैया नवघरे यांच्या सह विजय चव्हाण,किरणसेठ देशमुख,रविराज देशमुख,शिवा ठाकुर,सुरज फेगडे,बंधु पवार, वकियोद्दीन सिद्दिकी आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement