माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगरपरिषद राज्यात द्वितीय तर विभागात प्रथम.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
नगरपालिकेत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत, निसर्गाशी संबंधित पाच घटकांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा-जमीन,पाणी,वायू,अग्नि आणि आकाश आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेअंतर्गत हिंगोली नगरपरिषदेला ४.० मध्ये राज्यात द्वितीय तर छत्रपती संभाजी नगरपरिषदेला ५.० मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.
माझी वसुंधरा सन्मान सोहळा दि.२१ फेब्रुवारी शनिवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम,वरळी मुंबई येथे पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हिंगोली नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सौ.रेखाताई बांगर,नगरसेवक श्रीराम बांगर, नगरपरिषद हिंगोलीचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे,शहर अभियंता प्रतीक नाईक,शहर अभियान व्यवस्थापक डॉ.पंडित मस्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला.४.०माझी वसुधंर अभियान स्पर्धेत राज्यातील द्वितीय पारितोषिक ४ कोटी रुपये आणि ५.०माझी वसुधना अभियान स्पर्धेत विभागातील प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये होते.माझी वसुंधरा अभियानांतर्गत विभागात प्रथम व राज्यात द्वितीय पारितोषिक प्राप्त हिंगोली नगरपरिषदेवर नगराध्यक्ष सौ.रेखा श्रीराम बांगर, उपाध्यक्ष मोहम्मद माबुद बागवान,मुख्याधिकारी सौ.अरविंद मुंढे यांच्यासह सर्वच नगरसेवकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.














Add Comment