राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र अतिश जयप्रकाश दांडेगावकर भाजपा पक्षात पक्षप्रवेशासाठी समर्भथकांसह भव्य शक्तिप्रदर्शन करत मुंबई कडे रवाना झाले
अतिश जयप्रकाश दांडेगावकर उद्या दि २६ फेब्रुवारी रोज गुरुवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असुन
दि.२५ फेब्रुवारी बुधवारी मुंबईला रवाना होण्यापूर्वी आतिश दांडेगावकर यांनी वसमत शहरासह विधानसभेत भव्य शक्तीप्रदर्शन केले ५०० पेक्षा जास्त वाहनांचा ताफा घेऊन आणि हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले.
दि २५ फेब्रुवारी रात्री कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था देवाची आळंदी येथे असुन उद्या सकाळी आतिश दांडेगावकर हे समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत,मुंबई येथे पक्ष कार्यालयात त्यांचा समर्थंकासह भाजपा मध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
अतिश दांडेगावकर यांचे वडील जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सहकार मंत्री आणि दोन वेळा आमदारही राहिले आहेत ते वसमत विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते मानले जातात पुर्णा सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत.शेतकरी आणि सहकार क्षेत्रावर त्यांची कमालीची पकड आहे.
अतिश दांडेगावकर यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे,त्याचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार असून.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत वसमत विधानसभेत भाजपला मोठा जनाधार मिळणार आहे.
जयप्रकाश दांडेगावकर यांनी भविष्यात भाजपा कडुन लोकसभा निवडणुक लढवली तर नवल वाटणार नाही.














Add Comment