मागसवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासाठी जमीन खरीदी करिता दि.23/09/2014 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग लातूर यांच्या पत्रानुसार 3,9,14000(तीन कोटी नऊ लाख चौदा हजार रुपये) इतका निधी पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील सर्व्हे नंबर 138/1 जलसंपदा विभागाच्या मालकीची असलेल्या जमिनीपैकी 50 आर जमीन खरीदीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता परंतु सन 2018 च्या दराप्रमाणे त्या प्रचलित जमिनीचे मूल्यांकन चार कोटी पाच लाख तेहत्तीस हजार रुपये इतके गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून निश्चित केले होते परंतु वाढीव रक्कम प्राप्त न झाल्यामुळे सदरचे प्रकरण अद्याप प्रललंबीत आहे,याबाबत आम्ही सन 2017 पासुन शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत परंतु या बाबीकडे लोक प्रतिनिधी व प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे सदरचा अखर्चित 3,9,14000 रुपये निधी दि.9 आक्टोंबर 2019 रोजी सरकारने वापस घेतला आहे,
सन 2019 पासून अनेक विकास कामासाठी वसमत तालुक्याला हजारो कोटी रुपये मिळाला परंतु गोरगरिबांच्या लेकराच्या भविष्यासाठी चार-पाच कोटी रुपये उपलब्ध होऊ शकला याची मोठी खंत आहे त्यामुळे आज मागासवर्गीयांच्या लेकरांना भोरीपगांव शिवारातुन उन्हात पावसात हिवात दोन ते अडीच किलोमीटर शाळा कॉलेजात ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे त्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे,तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या आजुबाजूला अनेक समस्याचे माहेर घर बनले आहे,एकीकडे समाज मंदिर,पुतळे,रस्ते या साठी मोठा गाजावाजा करून निधी उपलब्ध केल्या जातो परंतु या बाबतीत सर्वच मूग गिळून गप्प बसले आहेत त्यामुळे मागास वर्गीयांच्या लेकरांना कोणीच वाली नसल्याचे दिसून येते त्यामुळे वसतिगृहासाठी जमीन खरीदीस उपलब्ध झालेला निधी सरकारला भीक लागल्यामुळे वापस नेला असल्यामुळे दि.17 मार्च 2026 रोज मंगळवार सकाळी 10:30 वाजल्यापासून सार्वजनिक रस्त्यावर,सरकारी कार्यालया समोर,शहरातील मुख्य बाजारपेठेत भीक मागो आंदोलन करणार असुन विविध मागण्याच्या निवेदनासह भीकेतून मिळालेला पैसा आपल्या मार्फेत सरकारला पाठवणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना आनंद खरे यांच्या वतीने देण्यात आले
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख
वसमतनगर जि.हिंगोली














Add Comment