आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत प्रशिक्षण शिबिर दि.४ मार्च ते दि.१० मार्च पर्यंत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर वसमत समोर सुवर्णकार कॉलनी वसमत येथे घेण्यात आले दि.१० मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्य शिबिराचा सांगता समारोप,प्रमाणपत्र वाटप व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात १५० ते २०० महिलां व मुलींनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष वसमत नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.सुनिता बाहेती मॅडम,कार्यक्रमाचे मुख्य अतिथी वसमत तहसीलदार सौ.शारदा दळवी मॅडम सौ.अंबिका चव्हाण मॅडम शहर पोलीस,सौ.कुसुम भोसले ( पडोळे )मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका,डॉ.सौ.वैशाली डिग्रसे मॅडम,डॉ.सौ.पार्डीकर मॅडम,नगरसेविका डॉ.सौ.रेणुका पतंगे मॅडम,कॅनडा बँक मॅनेजर सौ.श्रद्धा चव्हाण मॅडम,डॉ.सौ.अश्विनी टाक मॅडम,डॉ.वैष्णवी कुल्थे मॅडम तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते ग्रामीण पोलिस स्टेशन पि.एस.आय.डक साहेब तसेच कार्यक्रमासाठी सराफा असोसिएशन चे अध्यक्ष दिपक कुल्थे,सेवा निवृत्त डी.वाय.एस.पी.राजा टेहरे जेष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे,महिला पत्रकार अनिता चव्हाण मॅडम,सोनार समाज युवा मंच अध्यक्ष ॲड.सतीश कुल्थे,ॲड दिपक गुंडले व परिसरातील नागरिक तसेच पालक वर्ग महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्तिथी होती.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती प्रतिमेच्या पुजनाने झाली व नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्तीथ पाहुण्यांनी व तहसीलदार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातील सर्व महिलांचे व आयोजक,प्रायोजक यांचे कौतुक केले.या वेळी शिबिरात शिकवण्यात आलेली कराटे व काठी प्रातक्षिके सुद्धा सादर करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक मास्टर सोमनाथ हेगु सर,मास्टर संभाजी कुसळे सर,मास्टर सिमा पाठक मॅडम,मास्टर आकांशा दवणे मॅडम या आयोजकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे स्पॉन्सर प्रायोजक अन्वी मोटर्स इलेक्ट्रिक स्कूटर शोरूम चे मालक सचिन दहिवाळ सर यांनी केले होते व यांच्या तर्फे ५० महिलांना स्टिक सुधा वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी गुजराती मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन पुनम टाक मॅडम यांनी केले.
या वेळी मोठ्या प्रमाणत परिसरा तील आणि वेगवेगळ्या कॉलनीतील नागरिक महिला पालक वर्ग उपस्तिथ होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मास्टर सोमनाथ हेगू,मास्टर संभाजी कुसळे, मास्टर आकांक्षा दवणे,मास्टर सीमा पाठक मॅडम,सचिन सर दहिवाळ,सोहम धोंडे,पंकज मगर,पायल चव्हाण,संस्कृती चंदेल,गुंजन कार्ले,संध्या क्षीरसागर,अथश्री डहाळे,श्रेयश हेगू,राणा राजवीर चंदेल यांनी परिश्रम घेतले.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख
वसमत जि.हिंगोली














Add Comment