वसमत / प्रतिनिधी
दि. २६ मार्च रोजी वसमत शहरात रामनिमित्त देवकृपा मित्र मंडळातर्फे भक्तांसाठी दोन क्विंटल पोह्यांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.रामनवमीचा पवित्र सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शहरांमध्ये शोभायात्रा, पूजा-अर्चा,भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वसमत शहरातही रामनवमीच्या निमित्ताने निघालेल्या भव्य शोभायात्रेत हजारो रामभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे संपूर्ण वसमत नगरी“राममय”झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील देवकृपा मित्र मंडळाने शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांसाठी पोह्यांचे वाटप आयोजित केले होते.हा कार्यक्रम देवकृपा ज्वेलर्स समोर,भुसार लाईन,झेंडा चौक,वसमत येथे पार पडला.
सकाळपासूनच मंडळाचे सदस्य पोहे तयार करण्याच्या कामात व्यस्त होते.या उपक्रमात मंडळाचे सदस्य तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला दुपारपासून सुरू झालेल्या या अन्नदान उपक्रमात सुमारे दोन क्विंटल पोह्यांचा महाप्रसाद भक्तांना वितरित करण्यात आला.
अन्नदान कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र येत भजन-कीर्तन केले आणि एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.देवकृपा मित्र मंडळाने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल रामभक्तांसह सर्व स्तरांतून समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की,
“आमच्या या छोट्याशा सेवाकार्यातून समाजात एकता,प्रेम आणि भक्तीची भावना अधिक दृढ व्हावी,हीच आमची इच्छा आहे.”
देवकृपा मित्र मंडळातर्फे रामनवमीनिमित्त भक्तांसाठी दोन क्विंटल पोह्यांचा महाप्रसाद













Add Comment