Editor Choice Hingoli dist Maharashtra

वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन अनुशेष आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नामुळे दूर होण्याच्या मार्गावर

वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन अनुशेष आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नामुळे दूर होण्याच्या मार्गावर

वसमत / तालुका प्रतिनिधी

दि.२० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाडा २०२६”अंतर्गत सिंचन विषयक महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांच्या. दालनात पार पडली.
वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गास तात्काळ कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीत पुढील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली –
केळी पाझर तलावाचे पुनर्जीवन करून सिंचन क्षेत्र वाढवणे
पूर्णा प्रकल्पावरील सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना (मौ. पोटा,ता.औंढा नागनाथ) लवकर कार्यान्वित करणे
शिरडशहापूर,जुनुना,राजवाडी,गवलेवाडी येथील महत्त्वाच्या तलावांची तात्काळ दुरुस्ती
या सर्व कामांबाबत आवश्यक त्या सूचना देत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
वसमत मतदारसंघातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देणे आणि सिंचन क्षेत्रात भरीव वाढ करणे ही प्राथमिकता असून,प्रशासनाच्या समन्वयातून यासाठी ठोस पावले उचलली जातील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement