Maharashtra Social work Vasmat city

वसमत शहरात महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी.

वसमत / तालुका प्रतिनिधी
दि.१९ एप्रिल रोजी वसमत शहरात महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम,अन्नदान तसेच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही जयंती आनंददायी आणि उत्सवी वातावरणात साजऱ्या करण्यात आल्या.
शासकीय विश्रामगृह,वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती व परशुराम महाराज जयंती उत्साहात पार पडली.यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्यासह नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच,गणेश पेठ येथील वीर सेवा तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त महाआरती व महापूजा संपन्न झाली.यावेळी संस्थानचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याशिवाय,वसमत येथील एस.टी.महामंडळ आगारातही बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या ठिकाणी अन्नदानाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास श्री दिगंबर शिवाचार्य महाराज,नगरसेवक,तसेच एस.टी.आगारातील अधिकारी,कर्मचारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement