वसमत येथे ‘नमो सेवा गाथा’ पथनाट्य व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान,जनकल्याणकारी योजनांची पथनाट्यातुन जनजागृती
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत येथील सुरमणी स्व.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात दि.१० ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘नमो सेवा गाथा’ पथनाट्य सादरीकरण आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात वैद्यकीय,उद्योग,शिक्षण,कृषी,सामाजिक कार्य,क्रीडा,साहित्य-कला,पत्रकारिता,कायदा,व्यसनमुक्ती,योग तसेच गोसेवा व गोरक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नमो सेवा गाथा’ या पथनाट्याच्या माध्यमातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवाप्रवासासह केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि महत्त्वपुर्ण निर्णयांची माहिती प्रभावीपणे सादर करण्यात आली.शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे,नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे,हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे नियोजन,आयोजन आणि प्रस्तावना आतिशभैय्या दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे सर आणि यल्लप्पा मिटकर सर यांनी केले.त्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
वैद्यकीय व पशुवैद्यकीय क्षेत्रातुन डॉ.विजयप्रकाश तांभाळे,डॉ.मारोती क्यातमवार,डॉ.भीमराव गारोडे,डॉ.उत्तम भागानगरे, डॉ.भगवान लोडे,डॉ.भारत शेळके आणि डॉ.एकनाथ बुक्तरे यांचा गौरव करण्यात आला.उद्योग क्षेत्रातुन लक्ष्मिनारायण मुरक्या,शीतलकुमार बाफना,यशवंतराव उबारे,सचिन मुळे,राजेश वाघ,नागनाथ राखे, भगवान राखोंडे,वनीताताई दंडे आणि सीए शुभम लोहिया यांना सन्मानित करण्यात आले.शिक्षण क्षेत्रातुन नारायण जाधव,किशन इमडे,जीवनप्रकाश कुलकर्णी,बाबुराव खराटे,रंगनाथ दंडे आणि जिजाबाई सारंग यांचा गौरव करण्यात आला.
कृषी क्षेत्रातुन मारोती गाढवे,आकाश अंभोरे,बबनराव ढोबळे,केदारनाथ राखोंडे, साहेबराव शिंदे आणि रमेशराव सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.सामाजिक क्षेत्रातुन तुळशीराम ताटेवार,निवृत्ती कुंटे,दासराव कातोरे,सुभाष भोपाळे,विजयकुमार विभुते,धोंडीराम अंभोरे,नागोबा बोचकरी,शंकर घोटेकर व विष्णु गणेश मंडळ,राजु सिद्दिकी व लायन्स क्लब,रामराज्य भक्त मंडळ वसमत,नाजेमा सय्यद आणि एकनाथ नागरे यांचा सन्मान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रातुन हरिभाऊ रावळे,निवृत्ती बांगर,नवनाथ लोखंडे,अमोल बोरीवाले,प्रा.डॉ.बंकट यादव,नवनाथ भालेराव,विजय कुदाळे,डॉ.शिवशंकर कापसे आणि संजय ठाकरे यांना गौरविण्यात आले.साहित्य व कला क्षेत्रातुन केशव खटिंग,प्रभाकर सालमोठे,गजानन पाठक,श्रीरंग थोरात,चारुशीला पैंजणे,लक्ष्मिकांत जोशी-धानोरकर आणि शिवदास पोटे यांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातुन सत्यविजय अन्वेकर,पंकज नांदापुरकर आणि मोईन कादरी यांना पुरस्कार देण्यात आले.गोसेवा व गोरक्षण क्षेत्रातुन अतिष अग्रवाल,अमोघ विनायक महाराज आणि गोविंद घुसे यांचा गौरव करण्यात आला.तसेच ज्येष्ठ विधिज्ञ रणधीर तेलगोटे,व्यसनमुक्ती क्षेत्रातील बाबुराव जांबुतकर आणि महिला योग क्षेत्रातील मंगलाताई सातपुते-खानापुरे यांचाही सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला भा.ज.पा.हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन घुगे,युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे,किसान जिल्हाध्यक्ष विजय नरवाडे,जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार व विजय कडतन,गुरुपादेश्वर महाराज,जिल्हा सरचिटणीस खोब्राजी पाटील नरवाडे,गणेश कमळु,आदित्य देशपांडे,मारोती क्यातमवार,प्रीतीताई जयस्वाल,रत्नमालाताई शिंदे,शहराध्यक्ष विष्णु बोचकरी,ग्रामीण पुर्व मंडळाध्यक्ष डॉ.अवधुत शिंदे,ग्रामीण पश्चिम मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंजाळ,जवळाबाजार मंडळाध्यक्ष राजु आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध क्षेत्रांत समाजासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यामुळे सामाजिक कार्यकर्ते,गुणवंत आणि संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन मिळुन इतरांनाही समाजहितासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाली.














Add Comment