Celebration • Editor Choice • Good working

सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन संपन्न

सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन संपन्न 

१४ व १५ ऑक्टोबर रोजी नांदेड रोड लगत भव्य शंकरपटाचे आयोजन,नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत 

वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सवांतर्गत आयोजित प्रदर्शनीचे मंगळवार,दि. १३ ऑक्टोबर रोजी उत्साहपुर्ण वातावरणात थाटात उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

या प्रदर्शनीचे उद्घाटन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ.सुनीता मनमोहन बाहेती, जयप्रकाशजी मुंदडा,तहसीलदार सारंग चव्हाण,पोलीस निरीक्षक सुधीर वाघ,महावितरणचे अधिकारी मंत्री साहेब, ना.तहसीलदार विनोद डोणगावकर,लक्ष्मीकांतभैया नवघरे,अन्वेकर मामा,शिवदासजी बोड्डेवार यांच्यासह नगरसेवक,व्यापारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीमुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. विविध वस्तूंचे स्टॉल,आकर्षक मांडणी आणि खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तुंमुळे नागरिकांना खरेदीसोबतच मनोरंजनाचीही संधी मिळणार आहे.दसरा महोत्सवाच्या परंपरेला साजेशा या उपक्रमामुळे शहरातील उत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे सार्वजनिक दसरा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.आगामी काळात नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी या प्रदर्शनीला भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.

दि.१४ ‌व १५ ऑक्टोंबर रोजी नांदेड रोड लगत बजाज शोरूम च्या बाजुला भव्य शंकरपटाचे आयोजन

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने बुधवार,दि. १४ ऑक्टोबर रोजी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.हा शंकरपट सकाळी ठीक १० वाजता नांदेड रोडलगत बजाज शोरूमच्या बाजुला आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील पारंपरिक संस्कृती आणि बैलजोड्यांच्या कौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या शंकरपटाला विशेष महत्त्व आहे.या पारंपरिक खेळाचा आनंद घेण्यासाठी वसमत शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

या शंकरपटाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement