वाढदिवसाचा खर्च टाळुन आमदार राजुभैय्या नवघरे यांची रुग्णसेवेला पसंती आडगाव (रंजे) येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळुन रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात आले.यानिमित्ताने दि. ९ ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्यातील मौजे आडगाव रंजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते फीत कापुन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा,सत्कार आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी,तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी,या दृष्टीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण महत्त्वपुर्ण ठरणार आहे.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आडगाव (रंजे) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची उपस्थिती लाभली.तसेच या उपक्रमाचे आयोजक विजय चव्हाण,बब्लु चव्हाण,राजु सावंत,हनुमान चव्हाण,वसमत नगरीचे उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे,रमेश मानवते सर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष राजेश पतंगे यांच्यासह परीसतील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसारख्या महत्त्वपुर्ण कार्याला प्राधान्य देण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातुन देण्यात आला.रुग्णसेवा हीच खरी जनसेवा या भावनेतुन आयोजित करण्यात आलेला हा लोकार्पण सोहळा आडगाव (रंजे) परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपुर्ण ठरला.














Add Comment