Maharashtra • Social work • Vasmat city

वसमत सार्वजनिक दसरा महोत्सवावरील तणाव लक्ष्मीकांतभैया नवघरे यांच्या मध्यस्थीने निवळला

वसमत सार्वजनिक दसरा महोत्सवावरील तणाव लक्ष्मीकांतभैया नवघरे यांच्या मध्यस्थीने निवळला

विनापरवानगी मैदानावर उतरविण्यात आलेले साहित्य हटविण्याच्या सुचना,बैठकीत समन्वयातुन तोडगा

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत 

गेल्या सुमारे ४० वर्षांची परंपरा असलेल्या वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनावरून निर्माण झालेला तणाव अखेर दि.३० सप्टेंबर रोजी युवा नेते लक्ष्मीकांतभैया नवघरे यांच्या मध्यस्थीने निवळला.दसरा महोत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दसरा समितीची पुर्वपरवानगी न घेता आकाश पाळणे व अन्य साहित्य उतरविण्यात आल्याने हा विषय चर्चेत आला होता.

दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी युवा नेते लक्ष्मीकांतभैया नवघरे यांच्याशी संपर्क साधुन परिस्थितीची माहिती दिली.त्यानंतर नवघरे यांनी संबंधितांशी चर्चा करून मैदानावर विनापरवानगी उतरविण्यात आलेले साहित्य हटविण्याच्या सुचना दिल्या.तसेच सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्माण झालेला गैरसमज दुर करण्यासाठी समन्वय साधण्यात आला.

दरम्यान,वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सव गेल्या काही वर्षांपासुन संत नामदेव सेवाभावी संस्था वसमतच्या माध्यमातुन आयोजित करण्यात येत आहे.यावर्षीही याच संस्थेच्या माध्यमातुन सार्वजनिक दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असुन, महोत्सवाचे कंत्राट हणमंतराव संभाजीराव धुळगंडे पाटील व जय मल्हार ॲम्युझमेंट कंपनी,माळेगाव यात्रा यांना देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या पार्श्वभुमीवर दसरा महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात युवा नेते लक्ष्मीकांतभैया नवघरे यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेण्यात आली.बैठकीत मैदानावर साहित्य उतरविणे,आयोजनातील समन्वय तसेच निर्माण झालेल्या गैरसमजांबाबत चर्चा करण्यात आली.चर्चेनंतर समन्वयातुन मार्ग काढण्यात आला असुन महोत्सव शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यावर एकमत झाले.

वसमतच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला मोठी परंपरा असुन,शहरातील नागरिकांचा या उत्सवाशी भावनिक संबंध आहे.त्यामुळे सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून उत्सवाचा पारंपरिक उत्साह कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे यावर्षीचा सार्वजनिक दसरा महोत्सव आनंदी,उत्साही आणि शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे.

या बैठकीस लक्ष्मीकांतभैया नवघरे,रवी बडबने,गणेश काळे,भगवान कुदाळे,सुभाष मामा भोपाळे,सीताराम मॅनेवार,प्रकाश शहाणे,संकेत नामपल्ली,बाबा कुल्थे,नितीन अंबेकर,विनोद नामपल्ली,शिवाजी अडलिंगे,प्रशांत लोखंडे, बालाजी अडकिने,गिरीश देशमुख,गोपी माने,गजानन मेटे यांच्यासह दसरा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement