वसमतसह हिंगोली,नांदेड जिल्ह्यात भुकंपाचा सौम्य धक्का
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये -विकास माने,उपविभाग अधिकारी वसमत
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरासह हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील काही भागात शनिवार, दि.०३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजुन ४५ मिनिटांच्या दरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे.अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वसमत शहरातील विविध भागांत नागरिकांना जमिनीला व इमारतींना सौम्य हादरे जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांतही भुकंपाचा धक्का जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान,भुकंपाचा केंद्रबिंदु नेमका कुठे होता तसेच या भुकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल होती,याबाबत प्रशासनाकडुन अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.त्यामुळे भुकंपाची अचुक तीव्रता व केंद्रबिंदुबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच स्पष्टता होणार आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.प्रशासनाकडुन अधिकृत माहितीची प्रतीक्षा असुन,नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.














Add Comment