Editor Choice political party Vasmat city

शिवसेना वसमत विधानसभा मतदारसंघाची पदाधिकारी व कार्यकर्तो आढावा बैठक उत्साहात संपन्न.

 

वसमत/तालुका प्रतिनिधी

शिवसेना कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने ‘वर्धमान’ मंगल कार्यालय दुमदुमले.

आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची वसमत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ता महत्त्वपूर्ण आढावा बैठक दि.२३ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभागृह गजबजून गेले.‘वर्धमान’ मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात घोषणाबाजीने परिसर भारावून गेला.

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

या बैठकीचे आयोजन शिवसेना उपनेते,हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव तसेच हिंगोली जिल्हाप्रमुख व कळमनुरीचे आमदार संतोषजी बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा होते.

नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.तसेच शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला शिवसेना नेते राजेंद्र शिखरे,रामकिशन झुंजुर्डे पाटील,राजू चापके,राम कदम,रेखाताई देवकते,विनायक सातपुते, विशाल ढोरे,प्रभाकर क्षीरसागर,शिवाप्पा भालेराव,शिवराज यशवंते,गोविंद राखोंडे,रुस्तुमामा सारंग यांसह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

संघटनात्मक मजबुतीवर भर

बैठकीत वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी-वस्तीमध्ये शिवसेनेचे जाळे अधिक मजबूत करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या जनहिताच्या निर्णयांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि बूथ स्तरावर पक्षाची ताकद वाढवणे,हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.

या आढावा बैठकीला वसमत तालुक्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरणात ऊर्जा आणि एकजूट जाणवत होती.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement