Uncategorized

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले,नागरिकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे- एस.पी.नीलाभ रोहन (हिंगोली)

गेल्या ०४ वर्षात हिंगोली जिल्ह्यात अपघातात झपाट्याने वाढ झाली असून अनेक वाहनचालक अकाली मृत्यूच्या मार्गावर आले आहेत.त्यामुळे चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी केले आहे.हिंगोली जिल्ह्यातील सन २०२३ ते २६ या चार वर्षांच्या अपघातांच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये १६० लोकांचा मृत्यू झाला तर १९३ जण गंभीर जखमी झाले.२०२४ मध्ये १९८ जणांचा मृत्यू झाला तर १२३ जण गंभीर जखमी झाले.२०२५ मध्ये २३३ लोकांचा मृत्यू झाला असून १८० जण गंभीर जखमी झाले आहेत.२०२६ मध्ये ८८ लोकांचा मृत्यू झाला असून ५१ लोक गंभीर जखमी झाले आहेत.गेल्या चार वर्षांत ६७९ जणांचा मृत्यू झाला असून ४४७ जण गंभीर जखमी झाले आहेत.आपल्या जिल्ह्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.शिवाय एकूण अपघातांपैकी ३० टक्के अपघात हे संध्याकाळी ०६ ते रात्री ०९ या तीन तासांत होतात आणि एकूण अपघातांपैकी ६० टक्के अपघात दुपारी ०३ ते मध्यरात्री १२ या कालावधीत होतात.नीलाभ रोहन,अपर पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना यांनी सुचना दिल्या आहेत.याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून जिल्ह्यातील अपघातस्थळांभोवती नाकाबंदी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात दररोज नाकाबंदी केली जात असली तरी सर्व नागरिकांनी पोलीस व वाहतूक नियमांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात येत आहे,चारचाकी वाहनातून प्रवास करताना सर्वांनी हेल्मेट वापरावे,चालक व बाजूच्या सीटवरील तसेच मागील सीटवरील प्रवाशाने सीट बेल्ट लावून सुरक्षित प्रवास करावा.

Advertisement

Advertisement