Celebration Editor Choice Good working

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,वसमत यांच्या वतीने आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दि.२६ जुलै रविवार रोजी श्री सिद्धेश्वर विद्यालय चन्ने कॉलनी येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वसमत नगर परिषद तर्फे उपलब्ध झालेल्या नव्या अत्याधुनिक शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले तसेच वृक्षारोपण व भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप देखिल करण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये एकुण ९५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी,आवश्यक औषधोपचार,आरोग्य मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांबाबत सल्ला देण्यात आला.शिबिरामध्ये सामान्य वैद्यक,हृदयरोग,मधुमेह, स्त्रीरोग,बालरोग,अस्थिरोग,नेत्ररोग,कान-नाक-घसा (ENT),त्वचारोग,दंतरोग,शस्त्रक्रिया आदी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.ज्या रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता होती,त्यांना संबंधित तज्ज्ञ रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.

याच कार्यक्रमात आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते वसमत नगरपरिषदे तर्फे आलेल्या नव्या शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.ही सुविधा जिल्ह्यातील पहिली शववाहिनी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या सुविधेमुळे गरजु नागरिकांना सन्मानपुर्वक व तत्पर सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती,वैद्यकीय अधिकारी श्री काळे साहेब,श्री पवार,गटनेता सचिन दगडु,शहराध्यक्ष रवि बडवणे,माजी नगरसेवक धनंजय गोरे,वैद्यकीय समन्वयक शिवराज कदम,नगरसेवक राजकुमार एंगडे,नगरसेविका सौ.जयमाला गोरे, सौ.ज्योती वाव्हळे,नगरसेवक संकेत नामपल्ली,धिरज कुल्थे,दिपक हळवे,सारंग बेडके,सुभाष कदम तसेच सर्व नगरसेवक,पदाधिकारी,वैद्यकीय तज्ज्ञ,अधिकारी,कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.जनसेवा सप्ताहातील हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपुर्ण ठरला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement