लिटल किंग्ज इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप !
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) आयोजित इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल आणि मुक्ताई विद्यालय,वसमतच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करीत महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेत पुन्हा एकदा गरुड झेप घेतली आहे.शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा यश संपादन केले असुन हे विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या परीक्षेत शाळेचे एकुण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असुन,त्यांच्या यशामुळे शाळा पालक,शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इयत्ता सातवीतील पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे
श्रवण चंद्रकांत बागल,सर्वेश यशवंत आंबेकर,ईश्वरी गंगाधर भारती,गौरव चंद्रकांत डरंगे,श्रवण सुधाकर गोरे,तनुजा विष्णु कदम,सुमित श्रीधर ढगे
इयत्ता चौथीतील पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे
विष्णु गिरीश दिल्लीकर,सानवी मुकेश रत्नपारखी,पुजन प्रकाश कदम,गणराज ज्ञानेश्वर आडकिने,अथर्व गंगाधर भारती
असे या स्पर्धा परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत,शिक्षकांचे सातत्यपुर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
याबाबत शाळेचे संस्थापक प्रा.डॉ.नामदेव दळवी यांनी सांगितले की, “शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसुन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी आहे.आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.भविष्यातही गुणवत्तापुर्ण शिक्षण आणि संस्कारांच्या बळावर अशाच यशाची परंपरा कायम ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.”
शाळेच्या व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थ्यांचे,त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर यशाची नवी भरारी.हीच लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलची ओळख!” निर्माण झाली आहे.














Add Comment