Celebration Editor Choice Vasmat city

“विठ्ठल विठ्ठल” नामाच्या गजरात वसमतमध्ये क्षत्रिय समाजाची आषाढी एकादशी दिंडी उत्साहात संपन्न

विठ्ठल विठ्ठल” नामाच्या गजरात वसमतमध्ये क्षत्रिय समाजाची आषाढी एकादशी दिंडी उत्साहात संपन्न

दिशा न्युज मराठी २४×७,वसमत 

मुख्य संपादक- गिरीष देशमुख

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वसमत येथील गणेश पेठ परिसरातील क्षत्रिय समाजाच्या वतीने शनिवार दि.२५ जुलै रोजी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.”विठ्ठल विठ्ठल” नामाच्या अखंड गजरात निघालेल्या या दिंडीत समाजातील महिला,पुरुष तसेच वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.या भक्तीमय सोहळ्यामुळे संपुर्ण वसमत शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले होते.

दिंडीची सुरुवात गणेश पेठ येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरातून विठ्ठल-रखुमाईच्या पुजनाने करण्यात आली.त्यानंतर ही दिंडी पोलीस स्टेशन,महावीर चौक,झेंडा चौक या शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली.टाळ-मृदंगाचा गजर,विठु नामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या फुगड्यांमुळे संपुर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे उत्स्फुर्त आणि भव्य स्वागत केले.

शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरल्यानंतर दिंडीची सांगता पुन्हा गणेश पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात झाली.या ठिकाणी विठ्ठलाची भावपूर्ण महाआरती करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना आणि नागरिकांना फराळाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या भक्तीमय सोहळ्याला क्षत्रिय समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये सुभाषजी लालपोतु,रत्नाकर लालपोतु,भगवान कुदाळे,नागोबा सावजी,वसंत बोचकरी,वसंत शिकारी,प्रा.गणेश कमळु,पांडुरंग लांडगुं,दत्तात्रय नाकोड,मारुती बोबडे,विष्णु बोचकरी,रमेश बावले,मास्टर लाला तसेच गणपती मंदिर व सरस्वती मंदिर विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य आणि महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सदर आषाढी एकादशी दिंडी सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय समाजाच्या विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम आणि पुढाकार घेतला.या दिंडीमुळे वसमत शहरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले असुन सर्व स्तरांतुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement