अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अतिश भैय्या दांडेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.
वसमत / तालुका प्रतिनिधी
दि. ३१ मे रोजी मौजे हिवरा खुर्द,ता.वसमत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते अतिश भैय्या दांडेगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही उत्साहात पार पडला.यावेळी दौलत हुंबाड,अमोल मुळे,गजानन पप्पलवाड,मच्छिंद्र झिंजुर्डे,ज्ञानोबा काळे,मंचक काळे,श्रीकांत भुमरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले असून उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अतिश भैय्या दांडेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.













Add Comment